Ad will apear here
Next
‘आणखी तीस नव्या वेगवान रेल्वे सुरू करणार’
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

नवी दिल्ली : ‘देशातील विविध भागांमध्ये अतिजलद रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आणखी तीस नव्या वेगवान रेल्वेगाड्यांचे काम सुरू झाले असून, आणखी १०० अशा रेल्वे बनवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) पत्रकारांना दिली.

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या पहिल्या अतिजलद रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यानंतर गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गोयल म्हणाले, ‘ आपल्या देशात अशा आणखी ३० रेल्वे बनविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे सज्ज झाली आहे. नवीन रेल्वेंमुळे तिकीट दरात कपात करणेही शक्य होईल. त्यामुळे लोकांना रेल्वेने कमी पैशात जलद प्रवास करता येईल.’

‘पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली असून, ती ७७५ किलोमीटरचे अंतर केवळ आठ तासात पार करणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही रेल्वे या मार्गावर सेवा देणार आहे. यामध्ये कानपूर आणि अलाहाबाद असे दोन थांबे असतील. कमाल १६० किलोमीटर प्रती तास या वेगाने ती धावू शकते मात्र ती बहुतांश अंतर १३० किलोमीटर वेगाने पार करेल. या रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस आदी सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. यातील आसने १८० अंशाच्या कोनात वळणारी असून, अत्यंत आरामदायी आहेत. ही रेल्वेगाडी निर्माण करण्यासाठी ९७ कोटी रुपये खर्च आला आहे,’ असेही गोयल यांनी सांगितले.

‘संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी तयार करण्यासाठी केवळ १८ महिने लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मेक इन इंडिया’ मोहिमेचे हे यश आहे. या रेल्वेचे डिझाइन भारतीय अभियंत्यांनी केले आहे. हे अत्यंत अभिमानास्पद आहे,’ असेही गोयल यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZPCBX
Similar Posts
‘ट्रेन १८’चे नामकरण ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ नवी दिल्ली : ‘संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या इंजिनविरहित ‘ट्रेन १८’चे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी, २७ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे दिली.
नेताजींच्या पराक्रमाच्या साक्षीदार वस्तूंचे लाल किल्ल्यात संग्रहालय नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेली तीन संग्रहालये लाल किल्ल्यात सुरू करण्यात आली असून, २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संग्रहालये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, जालियनवाला बाग हत्याकांड आणि १८५७चे स्वातंत्र्यसमर या विषयांना वाहिलेली आहेत
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’ नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे
मधुबनी चित्रांनी सजणार जपानी रेल्वेगाड्या नवी दिल्ली : लवकरच जपानमधील रेल्वेगाड्या भारतीय मधुबनी (मिथिला) चित्रशैलीतील चित्रांनी सजलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण या मधुबनी चित्रांच्या सौंदर्याची भुरळ जपानलाही पडली आहे. भारतीय रेल्वेप्रमाणे आपल्या रेल्वेगाड्याही मधुबनी चित्रांनी सजवण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. त्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language